लॉग-इन ( Login ) / रजिस्टर ( Sign up )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविध १४ पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यात प्रामुख्याने राज्यसेवा तसेच सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या परीक्षांचा समावेश आहे. सदर परीक्षा पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्यात घेतल्या जातात. अजून वाचा
सरळसेवा भरती
सरळसेवा भरती अंतर्गत विविध खात्यातील अधिकाऱ्यांची थेट शिफारस केली जाते, ४७ विविध पदांकरिता चाळणी परीक्षा / मुलाखत किंवा दोन्हीही घेतल्या जातात. अजून वाचा
विभागीय परीक्षा
या परीक्षा विविध पदांवर कार्यारीत असणाऱ्या परिविक्षाधीन अधिकार्यांकरिता घेतल्या जातात. या परीक्षाद्वारे अधिकाऱ्यांच्या संबधित खात्यांबाबतचे ज्ञान तपासणे, भाषाविषयक कौशल्ये आत्मसात करणे तसेच पदावर नियमित नेमणूक होण्याकरिता या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अजून वाचा
मर्यादित विभागीय परीक्षा
विविध खात्यातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना थेट अधिकारी होण्याची संधी प्राप्त होते. उदाहरणार्थ पोलिस शिपाई ते हवालदार या परीक्षेद्वारे पोलिस उपनिरीक्षक होऊ शकतात, विक्रीकर खात्यातील लिपिक विक्रीकर निरीक्षक होऊ शकतात. अजून वाचा
 

सराव प्रश्नपत्रिका

तज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका - महाराष्ट्रभर असणाऱ्या आमच्या तज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने आम्ही जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न.
ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवा - अतिशय सोप्या पद्धतीने दिलेल्या व कठीण नसणाऱ्या इंटरफेस वापरून दिलेल्या निर्धारित वेळात प्रश्नपत्रिका सोडवा.
प्रश्नपत्रिका सोडवल्यावर लगेच निकाल.
विभागवार मिळालेले गुणप्रत्रक - जेणे करून विद्यार्थी ठरवू शकतात की कुठल्या विभागावर जास्त भर देण्याची गरज आहे.
कुठेही न जाता आपल्या मोबाईल फोन वरून किंवा डेस्कटॉप वरून उपलब्ध
 

प्रश्नमंजूषा

दैनंदिन घडामोडी प्रश्नमंजूषांच्या स्वरुपात
सदर प्रश्नमंजूषा विद्यार्थी सुद्धा अपलोड करू शकतात
चालू घडामोडींवर आधारित प्रश्नमंजूषा, ज्या आमच्या विशेष पॅनलने तयार केलेल्या असतील आणि त्या रोज नवीन उपलब्ध करून देण्यात येतील
प्रश्नमंजूषांमध्ये कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० प्रश्न असतील